The Soulful Atom

Reflecting over life through weird, crazy, ever changing, euphoric, absurd, confused and at times impartial lenses -a journey of curiosity and questions with my two alter egos.. as I try to fall out of the stagnation of instability.. or the desperate attempt to remain..

ती असते..
कुठल्या तरी शाळेच्या बाकावर कोरलेली..

तिथेच विसरून राहिलेल..

ती असते..

कुठल्यातर गल्लीच्या कोप्रिॅयेवार

लाजत ऊभी..

एका भयाण काळरात्री, वाट बघत थांबलेल

ती असते..

तिथच..

एका कुरळल्या बटी मधे गुंतून राहिलेली..

ते बंदा डोळे मनात साठवून घेत..

पहाटेची घृणा करत

ती असते..

टेकडीवर शांत शेजारी बसलेली..

वार्यावर येणारा तो सुगंध ते क्षण सामावून घेत..

ती असते..

कधी शांत, कधी मिश्किल..

कुठल्यातरी गाडीच्या धुरात वाहून गेलेली..
कुठल्या तरी जल्लोषात..
दुसर्यच्या मिठीत..
तिच्या घुसमटलेल्या अश्रू मधे..
कुठल्यातरी वळणावर अचानक भेटलेली
त्या दोघांच्या भिडलेल्या नजरेत लपलेली
आवडलेली, विसरलेली, नसूनही असणारी..

ती आपली ती..

ती तशीच असते..

प्रत्येक ठिकाणी ती आढळून येते..

बघा कधीतरी डोळे उघडून..

मनाला लागूनजाईल.. स्पर्शूनजाईल..

अशी ती एक प्रेमकहाणी सगळी कडे असते..

0 comments: