The Soulful Atom

Reflecting over life through weird, crazy, ever changing, euphoric, absurd, confused and at times impartial lenses -a journey of curiosity and questions with my two alter egos.. as I try to fall out of the stagnation of instability.. or the desperate attempt to remain..

Sorry for any grammatical errors in terms of ukar and velanti's :)

तो गातो, त्या कवितेचे शब्द

गोड, मधुर.. हृदयाला स्पर्षणारे, तेचाळणारे स्वर..

तो गातो माझ्या कानी..

अलगद, हळूच, नाजूक..

दूर कुठे तरी शांत, हिरव्या ठिकाणी नेऊन ठेवतात ते,

गातअसताना नकळत माझ्या कानापाशी त्याच्या ओठांचे रोमांच उभे करणारे हलके स्पर्ष..

तो वागतो असा की काहीच आगळे नाही..

भासवतो जणू मिच फक्त त्याच्या मनीची राणी..

हसतो, असतो.. रेंगाळतो, ओढवतो.. स्वप्नळतो, असतो..

पण हृदयात त्याच्या खोल आत दडली आहे ती..

नेहमीच होती.. नेहमीच राहील..

ती, जशी मी कधीच नाही..

नवते आणि नसेन..

अलगद, एक अश्रू डोळी येऊन थबकते..

त्या प्रेमाची आस त्या निखळ प्रेमाची अपुरी वासना होऊन तरंगते

आणि त्याच्या प्रश्णा मुळे हळुवार खाली ओघळते..

मी नवते आणि कधीच नसेन..

त्याच्या कवितेच्या स्वरात..

तो गातो माझ्या साठी माझ्या बरोबर ती गोड अशी कविता..

तो गातो ती आठवणीत गुरफटलेली कविता..

नकळत ती आठवण मलाच होते..

ती.. जशी मी नाही..

0 comments: